एमजीएममध्ये तोडफोड ; महिला डॉक्टरला मारहाण

Foto
 कोरोना संशयित वडिलांचा उपचरादारम्यान मृत्यू झाल्याची बातमी ऐकताच दोन्ही भावाणी आरडाओरड करीत डॉक्टर आणि रुग्णालयातील वैधकीय कर्मचऱ्याना मारहाण करून व्हेंटिलेटरसह रुग्णालयातील 50 हजाराच्या साहित्याची तोडफोड केली.या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
जितेंद्र प्रभुलाल जैस्वाल व विजेंद्र प्रभुलाल जैस्वाल (दोन्ही रा.तिसगाव, जि. औरंगाबाद) अशी रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या दोघांची नावे आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणाबाबत सिडको पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रभुलाल जैस्वाल यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने  त्यांना एमजीएम रुग्णालयातील कोविड वॉर्डातील ईआयसीयू मध्ये दाखल करून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.बुधवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.ही माहिती रुग्णालयातील वैधकीय अधिकारी जैस्वाल यांची दोन्ही मुले  जितेंद्र आणि विजेन्द्र यांना दिली.वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकताच जितेंद्र यानें रुग्णालयात आरडाओरड करण्यास सुरुवात केली.व कोविड वॉर्डातील आयसीयू मध्ये धुडघुस घालण्यास सुरुवात केली.तेथे उपस्थित कोरोनवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व वैधकीय कर्मचारी यांना मारहाण केली व तेथील व्हेंटिलेटर व वैधकीय साहित्याची तोडफोड केली.या प्रकरणी एमजीएम रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात दोन्ही भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना योध्याना मारहना झाल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर व वैधकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक डोईफोडे करीत आहेत.
---------------
डॉक्टरावरील हल्ले कधी थांबणार..

डॉक्टरवरील हल्ल्याची ही काही पहिली वेळ नाही या पूर्वी घाटी रुग्णालयातील व खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांवर अनेक वेळा नातेवाईकांकडून हल्ला झालेला आहे. घाटातील हल्ल्यानंतर घाटी परिसरात सुरक्षेसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना पास व  सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते.तर डॉक्टरांवर वारंवार होत असलेले हल्ले थांबविण्यासाठी सरकार ने कायदा बनविला आहे. मात्र तरी देखील अशे भ्याड हल्ले होतच आहे. हा कायदा अधिक कडक करण्याची आता गरज निर्माण झाली आहे.अन्यथा नातेवाईकांकडून  डॉक्टरांना होणारी मारहाण रोखणे शक्य होणार नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker